पाकिस्तानी एफ 16 विमानाने अडवली भारतीय प्रवासी विमानाची वाट

0

नवी दिल्ली – गेल्या महिन्यात पाकिस्तानी वायुसेनेने असे काही केले ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेला तणाव अजुन वाढू शकतो. पाकिस्तानी एफ -16 लढाऊ विमानांनी गेल्या महिन्यात काबुलकडे जाणाऱ्या स्पाइस जेट पॅसेंजर विमानास घेरले. एवढेच नव्हे तर त्याच्या वैमानिकास त्याची उंची कमी करण्यास सांगितले आणि विमानाचा तपशिलासह त्यांचा अहवाल देण्यास सांगितले. पाकिस्तानी हवाई दल ते घाबरून किंवा गडबडीत करत होते हे ठाऊक नाही. पण थोडीशी चूक झाली असते तर त्याचे परिणाम काहीही झाले असते.

वृत्तसंस्था एएनआय च्या वृत्तानुसार, ही घटना 23 सप्टेंबर रोजी घडली होती आणि त्यात स्पाइस जेट फ्लाइट एसजी -21 हे दिल्लीहून काबूलसाठी रवाना झाले होते.

यात सुमारे 120 प्रवासी होते. महत्त्वाचे म्हणजे जेव्हा पाकिस्तानची हवाई क्षेत्र भारतासाठी बंद केली गेली नव्हती तेव्हा ही घटना घडली आहे.

सूत्रांनी एएनआयला सांगितले की, स्पाइसजेट पायलटने पाकिस्तानी एफ -16 जेट पायलटांना माहिती दिली की, हे स्पाइसजेटचे भारतीय व्यावसायिक विमान आहे जे प्रवाशांना घेऊन काबूलला वेळापत्रकानुसार जात आहे. पाकिस्तानच्या एफ-16 च्या विमानांनी स्पाइसजेटच्या विमानाभोवती गराडा घातला तेव्हा पाकिस्तानी विमान आणि त्यांचे पायलट प्रवाशी बघु शकत होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रत्येक फ्लाइटचा स्वतःचा कोड असतो, जसे की ‘एसजी’ म्हणून ओळखल्या जाणारा स्पाइसजेट. पाकिस्तानी एटीसीने स्पाइसजेटचा कोड चुकून आयए म्हणून स्वीकारला आणि भारतीय सैन्य किंवा एअरफोर्सचे विमान. पाकिस्तानी एटीसीने आयए कोडसह भारतातून विमान येत असल्याची खबर दिली तेव्हा त्यांनी तातडीने त्यांचे भारतीय विमान विस्कळीत करण्यासाठी एफ -16 विमान उडवले.

हा गोंधळ संपल्यानंतर पाकिस्तानी लढाऊ विमानांनी स्पाइसजेटला पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रावरून अफगाणिस्तान सीमेवर नेले. डीजीसीएच्या अधिकाऱ्याने याची पुष्टी केली. प्रवाश्यांनी एएनआयला सांगितले, जेव्हा पाकिस्तानी एफ -16 ने स्पाइसजेटला घेराव घातला तेव्हा सर्व प्रवाशांना खिडक्या बंद करून शांतता राखण्यास सांगितले. उड्डाण काबूलमध्ये सुरक्षितपणे उतरल्यानंतर परतीचा प्रवास सुमारे पाच तास उशीरा झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here