मांजराचा पाठलाग करत बिबट्या आला दारापर्यंत

0

देवरूख : भक्ष्याच्या शोधात बिबट्या भर वस्तीत घुसत असल्याचे चित्र संगमेश्वर तालुक्यात गेली काही महिने पहायला मिळत आहे. यातच मंगळवारी सायंकाळी संगमेश्वर गोळवली येथे मांजराचा पाठलाग करताना बिबट्या घराच्या दारापर्यंत आला. बिबट्याला पाहताच घरातील मंडळींनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने जंगलात धुम ठोकली. मात्र या प्रकारामुळे गोळवलीवासिय भितीच्या छायेखाली वावरत आहेत.

मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास रमेश रामचंद्र देवरूखकर यांच्या मांजराचा पाठलाग करत बिबट्या थेट घराच्या दाराजवळ आला. मात्र हा प्रकार पाहताच देवरूखकर यांच्या घरातील मंडळींनी एकच आरडाओरडा केला. अशा प्रकारच्या पोस्टही सोशलमिडीयावर व्हायरल झाल्या आहेत. भयभित झालेल्या बिबट्याने थेट जंगल गाठले. या प्रकारामुळे गोळवली गावात बिबट्याच्या दहशतीमुळे घबराट पसरल्याचे चित्र आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गोळवलीवासियांची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here