आम्हाला ८० टक्के मते मिळणार – नारायण राणे

0

‘निवडणूक एकतर्फी होत असून आम्हाला ८० टक्के मते मिळणार असल्याचे समाधान’, असल्याची प्रतिक्रिया खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. नारायण राणे यांनी आज आपल्या सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. आमची आणि भाजपाची मते एकत्र आल्यास ७० टक्केच्या जवळपास पोहोचत आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

काय म्हणाले नारायण राणे

‘मतदान करणे प्रत्येकाचे कर्तव्य असून यावर्षी भाजपातर्फे नितेश राणे हे निवडणुकीला उभे असून त्यांना निवडणुकीत त्याच्या मतदारसंघात कणकवली , देवगड आणि वैभववाडी या तिन्ही मतदारसंघात वातावरण नितेश राणेसाठी पोषक आहे . आम्हाला ८० टक्के मतदान पडेल . त्यामुळेच ही निवडणूक एकतर्फी होईल ‘, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here