पीएमसी बँकेचा फैसला ३० ऑक्टोबर रोजी होणार- आरबीआय

0

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेसंदर्भात (पीएमसी) रिझर्व्ह बँक येत्या ३० ऑक्टोबर रोजी निर्णय जाहीर करणार आहे. आरबीआय ने आझाद मैदानात आंदोलन करणा-या पीएमसी खातेदारकांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन यासंदर्भात आश्वासन दिलेय.

पीएमसी खातेधारक गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. पीएमसी खातेदारकांची मंगळवारी आरबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यावेळी आरबीआयने सध्या आचारसंहिता लागू असल्याने निर्णय घेणे शक्य नसल्याचे सांगितले असल्याची माहिती एका खातेधारकाने दिली आहे. तसेच आरबीआयने २५ आणि २७ ऑक्टोबरला पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल असं सांगितले आहे. यावेळी आरबीआयने ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करु असेही आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here