रत्नागिरीत ८ नोव्हेंबरपासून पुलोत्सव

0

आर्ट सर्कल रत्नागिरी आणि आशय सांस्कृतिक पुणे यांच्या वतीने गेली 12 वर्ष रत्नागिरीत आयोजित होत असलेला पुलोत्सव यंदा 8,9 आणि 10 नोव्हेम्बर रोजी साजरा होणार आहे.

पु.लं. ची यंदा जन्मशताब्दीपूर्ती वर्ष आहे. याचंच धागा पकडून उद्घाटनाच्या दिवशी सादर होईल मैत्र हा कार्यक्रम सादर होईल. पु. ल., वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, मल्लिकार्जुन मन्सूर गोविंदराव पटवर्धन यांचं मैत्र सर्वश्रुत आहे. ही मैत्री “प्रतिभा” नामक एका मजबूत धाग्यात गुंफलेली होती. पु.लं च्या आयुष्यातील या सगळ्या प्रतिभावंत कलाकारांचं स्थान मोलाचं आहे. याच संकल्पनेवर गायक आदित्य मोडक, अभिषेक काळे, तबलावादक रामकृष्ण करंबेळकर, संवादिनी वादक गुरू पं. विश्वनाथ कान्हेरे आणि संवादिका अनघा मोडक मैत्र सादर करतील.

दि. 9 रोजी नाटक सादर होईल. दि. 10 रोजी पुलोत्सवाचा समारोप इर्शाद या काव्यवाचनाने होईल. संदीप खरे आणि वैभव जोशी या कवींनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशाबाहेरही मराठी काव्याला अफाट प्रसिद्धी मिळवून दिली आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच स्वरचित कविता सादर करण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. महाराष्ट्राबरोबरच जिथे जिथे विदेशात मराठी बांधव आहे त्या सर्वांना इर्शाद ने शब्दशः वेड लावलं आहे. सध्याच्या काळात वैभव संदीप ही कवींची जोडगोळी यात अग्रस्थानी आहे. हे दोन शब्दांचे जादूगार पुलोत्सवाचा समारोप करणार आहेत.

या कार्यक्रमांप्रमाणेच पुलोत्सव सन्मान, पुलोत्सव तरुणाई आणि पुलोत्सव कृतज्ञता सन्मान हे तीनही सन्मान मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहेत. तिन्ही दिवसांसाठी याचे देणगी मूल्य 300 रुपये असेल. देणगी प्रवेशिका दि. 6 पासून नाट्यगृहावर उपलब्ध असतील. सभासदांना नम्र आवाहन कार्यक्रमाला येताना आपली वार्षिक कार्ड्स न विसरता आणावीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here