रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्या वतीने महाशिबिराचे आयोजन

0

रत्नागिरी दि.26:- रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्या वतीने आज संविधान दिनाचे औचित्य साधून घटनादिन व विधी सेवा पंधरवडा यानिमित्त लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणारा महाशिबिराचे आयोजन जिल्हा न्यायालय आवारात करण्यात आले. या महाशिबिराचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राजेश जोशी यांनी केले. यावेळी त्यांनी न्यायालय आवारा उभारण्यात आलेल्या सर्व स्टॉलसना भेट देऊन प्रत्येक विभागाकडून लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेतली . यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार तसेच विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश आनंद सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, रत्नागिरी चे प्रांतधिकारी विकास सुर्यंवशी, रत्नागिचे तहसिलदार शशिकांत जाधव, न्यायाधीश, वकील, लॉ कॉलेजचे विद्यार्थी आदि मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना श्री. जोशी म्हणाले संविधानाने दिलेल्या अधिकारांची सर्वांनी जाणीव आहे, पंरतु आपल्या जबाबदारीची जाणीवही होणे गरजेचे आहे. शासनाकडून समाजातील प्रत्येक घटकासाठी विविध योजना राबविल्या जातात. पंरतु त्यांच्या माहिती अभावी त्या त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत. आजच्या दिवशी सर्व योजना एका ठिकाणी आणून त्या समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचाव्यात या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे ते म्हणाले. सर्व नागरिकांनी भारताचे संविधान उद्देशिकेला मूर्तरुप दिले तर आपला देश आणखी प्रगत देश होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाशिबिराचे सर्वांनी लाभ घ्या असे आवाहन केले.
यावेळी विधी सेवा प्राधिकारण कडून देण्यात येणाऱ्या विविध लाभाचे माहिती देणारे कलापथक एस.बी. किर लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. भारताचे संविधान उद्देशिका प्रतिमेचे अनावरण यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राजेश जोशी यांनी केले. उद्देशिकाचे वाचनही यावेळी करण्यात आले.
या शिबिरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सामाजिक न्याय विभाग, महिला व बालविकास विभाग, विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, आरोग्य विभाग, मनोरुग्णालय, तहसिलदार कार्यालय, राष्ट्रीयकृत बँक व पोस्ट ऑफीस, जिल्हा परिषद, कृषि विभाग आदि विभागांने सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here