पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूने दिली स्पाॅट फिक्सिंगची कबुली

0

पाकिस्तानचा माजी फलंदाज नासीर जमशेदने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या २०१६-१७ च्या मोसमात स्पाॅट फिक्सिंग केल्याची कबुली दिली आहे. इंग्लंडमध्ये मँचेस्टर क्राउन न्यायालयात नासीरने आरोप मान्य केले आहेत. गेली दोन वर्षे नासीर हे आरोप फेटाळत होता. या घटनेची व त्याने सांगितलेल्या सामन्यांचे अवलोकन केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात न्यायालय शिक्षा सुनवणार आहे. २०१८ साली नासीरला १० वर्षाच्या बंदीची शिक्षा सुनवण्यात आली होती. २०१६ साली बांगलादेश प्रीमिअर लीग स्पर्धेत नासीरने फिक्सिंग केले होते. या एका गोष्टीवर तो थांबला नाही. २०१७ साली पाकिस्तान प्रीमिअर लीगमध्येही त्याने असेच कृत्य केले होते. युसूफ अन्वर आणि एजाज अहमद या दोघांनी नासिरला यासाठी पैसे दिले होते. या दोघांनीही नासिरने स्पॉट फिक्सिंग केल्याचे मान्य केले आहे. डावाच्या सुरुवातीच्या दोन चेंडूंवर एकही धाव न काढण्यासाठी त्याने पैसे घेतले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here