रत्नागिरी शहर परिसरात दुकाने फोडणाऱ्या सराईत चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

0

रत्नागिरी शहर परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला होता. मागील काही दिवसांत चोरट्यांनी ५ दुकाने फोडली होती तसेच काही दुचाकी देखील चोरीला गेल्या होत्या. यामुळे पोलिसांपुढे या चोरांना पकडण्याचे आव्हान होते. दोन दिवसांपूर्वी हेळेकर मिठाई व आठवडा बाजार मधील एका मेडिकल स्टोअर्स मध्ये चोरी झाली होती. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घेतले होते व यावरून तपास करण्यात येत होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व रत्नागिरी शहर पोलिसांकडून गस्त घालत असताना २४ डिसेंबर रोजी सायंकाळी लाला कॉम्प्लेक्स येथे दोन संशयित मिळून आले व त्यांच्याकडील मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. रत्नागिरी शहर परिसरातील वरील ०४ मोटार सायकल तसेच ०५ दुकांनाचे शटर उचकटून चोरी व रत्नागिरी ग्रामिण पोलीस ठाणे हद्दीतील ०१ शटर उचकटून चोरी केली असल्याची कबुली दिली आहे. सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.प्रविण मुंढे,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. विशाल गायकवाड, मा.उप-विभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी श्री.गणेश इंगळे,यांचे मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री अनिल लाड, डी.बी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, पोउनि/जी.जी.सकपाळ, पोहेकॉ/दिपक जाधव, संजय साळवी, प्रमोद गायकवाड, विकास चव्हाण, पोना/प्रसाद घोसाळे, प्रविण खांबे, विलास जाधव, रोशन सुर्वे पोकॉ/नंदकुमार सावंत, मनोज लिंगायत, रत्नकांत शिंदे, राजेश धनावडे,सुशांत गमरे मपोना/सुजाता गुरव अशा पथकाने सहभाग घेवून सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here