नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे बंड्या साळवी विजयी

0

रत्नागिरी : माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांची राजीनाम्यामुळे घेण्यात आलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार बंड्या साळवी ११८२ चे मताधिक्य मिळवून विजयी झाले आहेत. त्यांना ०,००७ मते मिळाली तर बीजेपी उमेदवार अॅड दीपक पटवर्धन यांना ८,८२५ इतकी मत मिळाली. राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद कीर यांना ८,२५२ मते मिळाली तर माणसे उमेदवार रुपेश सावंत यांना ४१९ मते मिळाली. या निवडणुकीत नोटा मते वाढतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती मात्र ३५४ जणांनीच नोटा चे बटन दाबून आपली नापसंती व्यक्त केली.
हि निवडणू लादण्यात आल्याचा मुद्दा शिवसेनेच्या विरोधात असणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी केला होता. त्यामुळे रत्नागिरीतील मतदार नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बीजेपीने हि निवडणूक प्रतिष्ठेची केली होत. बीजेपीचे सुमारे अर्धा डझन आमदार निवडणूक प्रचारासाठी रत्नागिरीत आले होते. या निवडणुकीत बीजेपीने शहरातील सरासरी मतात वाढ केल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीने देखील कमी नगरसेवक असताना कडवी झुंज दिली. मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सुमारे ९ हजार मत पडली होती तो मतांचा आकडा कायम राखण्यात राष्ट्रवादीला यश आले. मात्र अपेक्षित मताधिक्य गाठण्यात यश आले नाही. मतमोजणीच्या सुरवातीपासूनच शिवसेना आघाडीवर होती व त्या मागोमाग बीजेपीचे मताधिक्य होते. चौथ्या राउंड अखेर बंड्या साळवी फक्त ६६४ मातानीच आघाडीवर होते. त्यामुळे ५ वी फेरी निर्णायक ठरणार होती. या फेरीत राष्ट्रवादी उमेदवाराने अधिक मते घेतल्याने शिवसेना उमेदवार बंड्या साळवी यांचा विजय निश्चित झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here