कोल्हापूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; ३० मोबाईल जप्त

0

 शहर आणि उपनगरात गेल्या सहा महिन्यापासून मोबाईल स्नॅचिंगचा धुमाकूळ घालणाऱ्या दोघा चोरट्यांकडून ३० मोबाईल, दोन दूचाकी असा सुमारे साडेचार लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यांचेकडून जिल्ह्यातील सहा जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आणखी त्यांचेकडून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कळंबा, पाचगाव, फुलेवाडी रिंगरोड, देवकर पाणंद व शिरोली एमआयडीसी मार्गावर पादचाºयांच्या हातातील पाच किमती मोबाईल दुचाकीवरून हिसडा मारून लंपास करणाऱ्या संशयित राज अंजुम मुल्ला (वय २१, रा. राजेंद्रनगर), प्रकाश शांताराम कोकाटे (२१, रा. मोतीनगर, मोरेवाडी) यांना अटक केली आहे. हे दोघे दूचाकीवरुन टेंबे रोड, शाहु स्टेडियम येथे येणार असलेची माहिती जुनाराजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अविनाश माने व टिमने सापळा रचून संशयितांना अटक केली. रस्त्यार मोबाईलवर बोलत जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या कानावर जोराने हात मारुन मोबाईल काढून घेत पळून जात होते. गेल्या सहा महिन्यात त्यांनी ३० मोबाईल स्नॅचिंग केले. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संशयित सराईत असून, त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे उपअधीक्षक कट्टे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here