संक्रातीच्या दिवशी मालवण समुद्रात ‘समुद्र मंथन’ शोध मोहीमेत गवसल्या पेशवेकालीन मूर्ती

0

मालवणचे संग्रहकार उदय रोगे यांच्या संकल्पनेतून मालवण समुद्रात राबविलेल्या ‘समुद्र मंथन’ शोध मोहीमेत 10 जुन्या मूर्ती सापडल्या आहेत. इतिहास अभ्यासक रणजित हिर्लेकर यांनी या मूर्ती पेशवेकालीन असल्याचे सांगितले आहे. या मूर्ती मालवण येथील शिवमुद्रा संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. मालवण येथील संग्रहकार उदय रोगे यांनी गेल्यावर्षी मकर संक्रातीच्या दिवशी मालवण समुद्रात आपल्या सहकाऱ्यांसोबत सागर मंथन मोहीम केली होती. त्यावेळी समुद्रातील 16 पुरातन पाषाण मूर्ती समुद्रातून बाहेर काढल्या होत्या. यावर्षी ही मकर संक्रांति दिवशी म्हणजे पुन्हा एकदा सागर मंथन मोहीम राबविण्यात आली. यावेळी सहकारी सोनोजी तोडणकर, गोविंद कोचरेकर, उमा टिकम, लिलाधर आचरेकर, मनोज केळुसकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या टीमने पुरातन मूर्तींचा शोध समुद्रतळाशी घेतला आणि त्यात तब्बल पाच तासाच्या ही मोहीमेत 10 मूर्ती मिळाल्या आहेत. इतिहास अभ्यासक रणजीत हिर्लेकर यांनी मिळालेल्या काही मूर्ती पेशवेकालीन असल्याचे सांगितले आहे. या मिळालेल्या पेशवेकालीन पुरातन मूर्ती शिवमुद्रा संग्रहालय मालवण येथे प्रदर्शन ठेवण्यात येणार आहेत. या सर्व मूर्तीची माहिती उदय रोगे यांच्या कडून सहाय्यक संचालक कार्यालय पुरातत्व विभाग रत्नागिरी यांना दिली जाणार असल्याचे सांगितले. इतिहास जतन व संवर्धन करताना अशा वस्तूंची कुठेही विक्री होऊ नये यासाठी ही नोंद पुरातत्त्व खात्याकडे केली जाणार असल्याचे श्री रोगे म्हणाले. या सागरमंथन मोहिमे साठी कोकण इतिहास परिषद यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here