इस्त्रोची आणखी एक झेप : GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

0

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने संशोधनात आणखी एक भरारी घेतली आहे. जीसॅट-३० (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरून यशस्वी प्रेक्षेपण केले आहे. आज पहाटे दोन वाजून ३५ मिनिटांनी उपग्रहाचे यशस्वी प्रेक्षेपण केले. GSAT-30 या उपग्रहामुळे इंटरनेट क्षेत्रात नवी क्रांत्री होणार आहे. या उपग्रहामुळे इंटरनेट आधिक गतीने चालणार आहे. याचप्रमाणे फ्रान्समधील फ्रेंच गुएनास्थित कोरो द्वीपसमूहातून याचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. हा उपग्रह प्रक्षेपणानंतर 15 वर्षं काम करत राहणार आहे. या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलं असून, यात दोन सोलर पॅनल आणि बॅटरी असल्यानं त्यातून ऊर्जा उत्पन्न होणार आहे. तसेच इस्रोच्या माहितीनुसार GSAT-30 हा एक संचार उपग्रह आहे. तो इनसॅट-4ए सेटलाइटच्या जागेवर काम करणार आहे. इनसॅट सॅटेलाइट-4चं वय आता पूर्ण होत आलं आहे. त्यातच इंटरनेट टेक्नोलॉजीमध्येही आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे जास्त शक्तिशाली उपग्रहाची गरज आहे. त्यासाठी इस्रोनं GSAT-30चं प्रक्षेपण केलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here