रत्नागिरीमध्ये महिला सुरक्षा विशेष कक्षाचे विशेष योगदान

0

रत्नागिरी येथील महिला सुरक्षा विशेष कक्षाने दुभंगलेले ६८ संसार सावरायला मदत केली आहे. कुटुंबामध्ये छोट्या कारणामुळे कलह होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. वादाच्या छोट्या ठिणगीने संसार दुभंगत आहेत. अशा स्थितीत महिला सुरक्षा विशेष कक्ष चांगले काम करत आहे. पुरुष संस्कृतीत महिलांचा छळ होण्याचे प्रमाण अधिक होते. छळाला कंटाळून महिला टोकाचा निर्णय घेत होत्या. कौटुंबिक वाद कोणाला सांगायचा, या संभ्रमात त्या होत्या. यासाठी गृह विभागाने प्रत्येक जिल्ह्यात महिला कक्षाची स्थापना करून महिलांवरील अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न केला. परिणामी आता चित्र बदलले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९ पर्यंत रत्नागिरीच्या महिला सुरक्षा विशेष कक्षाकडे ९८ अर्ज आले होते. त्यापैकी ६४ अर्ज महिलांचे तर ३४ अर्ज पुरुषांचे आहेत. त्यातील ६८ अर्जांमध्ये तडजोड करून संसार जुळविण्यात महिला कक्षातील कर्मचार्यांचना यश आले आहे. २४ जोडप्यांनी स्वतंत्र निर्णय घेतला आहे.दरम्यान, महिलांसाठी स्थापन केलेल्या कक्षात पुरुषांच्या तक्रारीही वाढल्या आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here