उपाहारगृह, कँटीनचालकांसाठी मुंबई विद्यापीठ उपकेंद्रात २२ जानेवारी रोजी कार्यशाळा

0

ईट राईट अर्थात सुरक्षित आणि पौष्टिक खाद्यपदार्थांचा पुरवठा करण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून शाळा- महाविद्यालय प्रतिनिधींची कार्यशाळा येत्या बुधवारी (दि. २२ जानेवारी) मुंबई विद्यापीठ उपकेंद्राच्या रत्नागिरी उपकेंद्रात होणार आहे. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच शाळा- महाविद्यालयातील उपाहारगृह/कॅन्टीन चालवणाऱ्या प्रतिनिधींनी या कार्यशाळेस अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे. शाळा, महाविद्यालयातील प्रत्येक कॅन्टीनला सकस आहाराची निवड कशी करावी, याची माहिती देणे आवश्यक असल्याने शाळांमधील कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या पिझ्झा, बर्गरसारख्या जंक फुडला लाल कंदील दाखवीत शाळा-महाविद्यालयात सकस आणि पौष्टिक आहार देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे चळवळ हाती घेण्यात आली आहे. या चळवळीला मुंबई विद्यापीठ उपकेंद्रानेदेखील चांगला प्रतिसाद दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कँटीनचालकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here