ओणी येथे कवी यशवंत स्मृती कविसंमेलन २ फेब्रुवारी रोजी

0

रत्नसिंधू कोकण विभाग कलामंच महाराष्ट्र आणि अखिल भारतीय शिक्षक, साहित्य, कला, क्रीडा, मंडळाच्या रत्नागिरी शाखेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र कवी यशवंत स्मृती राज्यस्तरीय कविसंमेलन येत्या २ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. ओणी (ता. राजापूर) येथील नूतन विद्यामंदिर विद्यालयाच्या गुरुवर्य शहाजी भाऊराव खानविलकर सभागृहात हे कविसंमेलन होईल. कविसंमेलनाचे उद्घाटन प्राचार्य एम. आर. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय शिक्षक, साहित्य, कला, क्रीडा मंडळाच्या रत्नागिरी जिल्हा शाखेचे अध्यक्ष अमित आदवडे भूषविणार आहेत. सकाळी १० वाजता कविसंमेलनाचे उद्घाटन होईल. दुपारी दीड वाजेपर्यंत संमेलन होईल. दुपारनंतर गीतगायन, पोवाडा, नाट्यछटा इत्यादी सादरीकरण, आणि सन्मान सोहळा होईल. कविसंमेलनाला प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध बालसाहित्यिक आणि गीतकार राष्ट्रपाल सावंत भूषविणार आहेत. कोकणासह राज्यभरातून निमंत्रित केलेले कवी आपल्या कविता या संमेलनात सादर करतील. कविसंमेलनाला कवी आणि साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here