‘हापूस रिसर्च सेंटर’ची रत्नागिरीत गरज – आंबा बागायतदारांची मागणी

0

आंब्यावर कीडरोगांच्या फवारणीचा खर्च वर्षाला १२ ते १५ लाख रुपयांच्या घरात जातो. औषध फवारण्याने तुडतुडाही मरत नाही. अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने उत्पादकांची बिकट परिस्थिती होते. यासाठी आंब्यावरील रोगांना पुरक औषधे निर्मितीसाठी कापूस, द्राक्षाप्रमाणे रिसर्च सेंटर रत्नागिरीत व्हावे अशी मागणी आंबा बागायतदारांनी केली. पणन मंडळ, अपेडा-नवी दिल्ली व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निर्यातक्षम आंबा उत्पादन व निर्यात या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. ही कार्यशाळा जिल्हा परिषद शामराव पेजे सभागृहात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी घोरपडे, बाजार समिती सभापती संजय आयरे, पणन विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील, सहाय्यक सरव्यवस्थापक मिलिंद जोशी, मधुकर दळवी आदी उपस्थित होते. याप्रसंगी कोकण कृषी विद्यापिठाचे संशोधक डॉ. बी.डी. शिंदे यांनी आंबा पिकावरील कीडरोगाची माहिती देतानाच प्रादुर्भाव झाल्यास त्यांचे निर्मूलन कसे करावे याची सविस्तर माहिती दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here