रत्नागिरी जिल्ह्याची सागरी सुरक्षा अवघ्या पाच स्पीड बोटींवर अवलंबुन

0

रत्नागिरी जिल्ह्याची सागरी सुरक्षा अवघ्या पाच स्पीड बोटींवर सुरू आहे. जिल्ह्याच्या सागरी गस्तीसाठी ९ स्पीड बोटी आहेत. यापैकी तब्बल चार स्पीड बोटी बंद अवस्थेत आहेत.पाच नौका कार्यरत असल्या तरी यातील एक नौका लवकरच भंगारात काढण्यात येणार आहे. स्पीड बोटीच्या दुरूस्तीचाच खर्च नव्या नौकेपेक्षा अधिक आहे. यामुळे नौका दुरूस्त करणे कठिण झाले आहे. लँडिंग पॉइंटवर पोलीस आणि सुरक्षा रक्षक नेमले आहेत. मात्र सुरक्षा रक्षकांचे कामच बेभरवशी असल्याने सागरी सुरक्षेकडे बोट दाखविले जात आहे. कोकणाला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. कोकणात रत्नागिरीत विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे. कोकण किनारपट्टी ही सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे. १९९३ ला रायगड किनाऱ्यावर स्फोटके मिळाली होती. अशा कारवाया रोखण्यासाठी सागरी गस्त मजबुत असणे आवश्यक आहे. परंतु स्पीड बोटींची घटती संख्या सुरक्षेबाबत चिंता करणारी आहे. सागरी सुरक्षा मजबुत असल्याचा दावा पोलीस दल करीत आहे. मात्र ज्या स्पीड बोटींवर ही सुरक्षा अवलंबुन आहे. त्यांची ताकद कमी होत चालली आहे. सागरी सुरक्षेसाठी एकूण ९ स्पीड बोटी आहेत. त्यापैकी चार बोटी बंद पडल्या आहेत. त्यांना दुरूस्त करण्यासाठी गोवा किंवा मुंबई शिपयार्डला न्यावे लागते. मात्र बंद पडलेल्या नौकांच्या दुरूस्तीचा खर्च त्या बोटींच्या किंमती एवढा आहे. त्यामुळे त्या दुरूस्त होतील याची शक्यता कमी आहे. त्यापैकी एक नौका तर कालबाह्य झाली आहे. त्यामुळे तिला भंगारात काढली जाण्याची शक्यता आहे. फक्त पाच स्पीड बोटीवर जिल्ह्याच्या किनाऱ्याची सुरक्षा अवलंबुन आहे. जिल्ह्यातील लॉडिंग पॉइंटवर पोलीस दलाचे बारीक लक्ष आहे. त्याअनुषंगाने पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचे सांगितले जाते. तसेच काही ठिकाणी सुरक्षा रक्षकही नेमले आहेत. मात्र या सुरक्षा रक्षकांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने त्यांचे काम बेभरवशाचे आहे. सागरी सुरक्षेसाठी ९ स्पीड बोटी आहेत. त्यापैकी ५ चालू आहेत तर ४ नौका बंद आहे. सागरी गस्त प्रभावी होण्यासाठी २ नौका भाड्याने घेतल्या आहे. असे जिल्हा सुरक्षा शाखा, प्रभारी निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here