रत्नागिरी : एमआयडीसीच्या ताब्यातील ५ धरणांपैकी ४ धरणे कमकुवत

0

रत्नागिरी शहरासह परिसरातील गावांना आणि एमआयडीतील उद्योगांना एमआयडीकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणी पुरवठा करण्यासाठी एमआवडीकडे पाच धरणे आहेत. यामध्ये हरचेरी, घाटीवळे, निवसर, अंजणारी आणि आसोडे या धरणांचा समावेश आहे. हरचेरी धरण १९७२ साली बांधण्यात आले आहे. असोडे धरण १९८२, घाटीवळे १९९२, निवसर १९९५ आणि अंजणारी धरण २००१ साली बांधण्यात आले. पाचही धरणे बांधून बराच कालावधी उलटला आहे. या धरणाची किरकोळ दुरुस्ती करण्यात आली असली तरी मोठ्या दुरूस्त्या न झाल्याने ही धरणे कमकुवत झाली आहेत. धरणातील गाळही न काढल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता निम्म्याने कमी झाली आहे. हरचेरी, घाटीवळे, निवसर या धरणांनी गळती लागली आहे, तर अंजणारी, आणि आसोड ही दोन धरणे धोकादायक बनली आहेत. एकूणच पाच धरणांची दुरूस्ती, सुरक्षिततेबाबत एमआयडीसीने ऑक्टोबर २०१९ मध्ये कोकण मंडळाच्या अधिक्षक अभियंत्यांकडे सल्ला आणि मार्गदर्शन मागविले आहे. त्यांनी पाहणी करून दुरूस्ती किंवा नवीन धरणाबाबत सुचवायचे आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया होणार आहे. मात्र या कार्यालयात तीन महिने एमआयडीसीचा प्रस्ताव पडून आहे. याचा लवकरात लवकर विचार झाला न झाल्यास ग्रामपंचायती, पालिका आणि उद्योगांना यंदाही पाणी टंचाईची झळ बसणार आहे. एमआयडीसीची पाच धरणं आहेत. या धरणातील पाणी टप्याटप्याने एमआयडीसीकडून चौदा ग्रामपंचायतींसह रत्नागिरी पालिकेला आणि एमआयडीसीतील उद्योगांना पुरविले जाते. गेल्या वर्षी पाणी टंचाई भासल्याने एमआयडीसीने १४ लाख रुपये खर्च करून पाटबंधारे विभागाच्या शिपोशी धरणातून पाणी विकत घेतले. ३२ किमीचा प्रवासात फक्त ६० टक्के पाणी एमआयडीसीला मिळाले. एमआयडीसीच्या या धरणांना गळती लागली असून दोन धरणे धोकादायक बनली आहेत. धरणाच्या बाजूचा भाग या अतिवृष्टीमध्ये कोसळला आहे. धरणांची पाहणी करून त्यावर तत्काळ उपाय सूचवावा यासाठी एमआयडीसीने अधिक्षक अभियंता (धरण) संकल्पचित्र मंडळ नाशिक यांना ऑक्टोबरमध्ये प्रस्ताव दिला आहे. मात्र यावर अजूनही विचार झालेला नाही. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात एमआयडीसीला पुन्हा पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पावसाळ्यात धोकादायक धरणांबाबतची चिंता वाढली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here