राज्यातल्या शाळांमध्ये आता मराठी विषय होणार सक्तीचा

0

राज्यातल्या शाळांमध्ये आता मराठी विषय सक्तीचा होणार असून त्यासाठी सरकार हालचाली सुरू केल्या आहेत. शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भातील कायदा येत्या अधिवेशनात मांडण्यात येईल, अशी माहिती मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलंय. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली. अधिवेशनात मांडावयाच्या अन्य राज्यांच्या कायद्याच्या धर्तीवर तयार केलेल्या मराठी भाषा अधिनियम प्रस्तावावर बैठकीत विस्तृत चर्चा झाली. ते म्हणाले, कायदा तयार करताना त्यातील तरतुदींचे पालन करणे सर्व शाळांना सुलभ झाले पाहिजे. फिरतीची नोकरी असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात आल्यानंतर वरच्या वर्गात मराठी विषय घेणे अवघड होईल, तेव्हा त्यांना यातून सूट मिळावी यासाठीची तरतूदही त्यात असावी. मराठीचा वापर वाढावा यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्यवाही करण्याची गरज असल्याची भावनाही देसाई यांनी यावेळी व्यक्त केली. मुंबई मराठी पत्रकार संघात ‘मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन’ या विषयावरील वार्तालापात सुभाष देसाई यांनी हे आश्वासन दिलं आहे. ‘इयत्ता बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात मराठी विषय अनिवार्य करणारा अधिनियम लागू करण्यासाठी मराठी भाषा विभागाकडून समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर, विधी व न्याय विभागाने अन्य राज्यांचे अधिनियम व केंद्रीय शिक्षण हक्क अधिनियम 2009च्या तरतुदी लक्षात घेऊन आपले अभिप्राय दिले आहेत’, असे देसाई म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here