शिवभोजनचा लाभ ठेकेदाराच्याच माणसांना, रत्नागिरीतील धक्कदायक प्रकार उघड

0

रत्नागिरी : शिवभोजन योजना सुरु झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी लाभार्थ्यांच्या कूपनमध्ये गोलमाल केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हा सर्व गैरप्रकार करण्यात आला आहे. गैरप्रकार उघडकीस आणल्यानंतर पुरवठा विभागाने याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधत महाविकास आघाडी सरकारने काल (26 जानेवारी) महत्त्वकांक्षी अशा शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ केला. मात्र ही योजना सुरु झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी लाभार्थींच्या कूपनमध्ये गोलमाल केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शिवभोजन योजनेचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराचीच माणसं कूपन घेत होती. विशेष म्हणजे याच योजनेच्या मेसमध्ये ही सर्व मंडळी काम करतात.

रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील शिवभोजन थाळीचा ठेका डी. एम. एंटरप्रायझेसला देण्यात आला आहे. मात्र याच डी. एम. एंटरप्रायझेसच्या दोन महिला कर्मचारी चक्क लाईनीत उभ्या राहून शिवभोजन थाळीचं कूपन घेताना दिसल्या. निशा मांडवकर आणि शितल खेडेकर असे या महिला कर्मचाऱ्यांची नावे आहेत. कूपन घेतल्यानंतर त्या शिवभोजन थाळीच्या मेसमध्ये काम करत होत्या. याबाबत त्या महिलांना विचारले असता ‘सुपरवायजर साहेबांनी सांगीतले म्हणून आम्ही कूपन घेतले’, अशी कबुली त्यांनी दिली.

सुपरवायझरला याबाबत विचारले असता त्या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांची एन्ट्री रद्द केली असल्याचं सांगत हात झटकले. या प्रकरणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, असं आश्वासन दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here