हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन देशांमधील जम्मू-कश्मीर मुद्द्यावर राष्ट्रपती रिसेप यांचे वादग्रस्त विधान

0

तुर्कीचे राष्ट्रपती रिसेप तैयम एर्दोगान यांनी कश्मीर राग आळवला आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन देशामधील जम्मू-कश्मीर मुद्द्यावर राष्ट्रपती रिसेप यांनी वादग्रस्त विधान केले असून दोन्ही देशातील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. जम्मू-कश्मीरमध्ये अत्याचार होत असून आम्ही शांत बसणार नाही, असे म्हणत रिसेप यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना विनाअट समर्थन देण्याचे आश्वासनही दिले आहे. राष्ट्रपती रिसेप तैयम एर्दोगान यांचे संपूर्ण भाषण इस्लाम आणि मुसलमान यांच्या भोवतीच फिरणार होते. जमिनीवर आखलेली कोणतीही सीमा इस्लामला वेगळे करू शकत नाही, असे एर्दोगान म्हणाले. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही निशाणा साधला. मध्य-पूर्व भागामध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप आक्रमणकारी आहे. ज्या भागामध्ये मुसलमान मारले जात आहे तेथी मुस्लिम देशांनी एकत्र होण्याची आवश्यकता असल्याचे एर्दोगान म्हणाले. एर्दोगान यांनी आपल्या भाषणादरम्यान दहशतवादाचा जनक असलेल्या पाकिस्तानला दहशतवादाचा सर्वात मोठे दुष्परिणाम भोगावे लागत असल्याचे म्हटले. तसेच एफएटीएफच्या बैठकीमध्ये विनाअट पाकिस्तानचे समर्थन करणार असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच पाकिस्तान हे आपले दुसरे घर असल्याचे म्हणत त्यांनी इमरान खान आणि खासदारांना खुश करून टाकले. तुमचे दु:ख माझे दु:ख आहे. आपली मैत्री प्रेम आणि सन्मानावर आधारित आहे. पाकिस्तान विकासाकडे वाटचाल करत असून हे काही एका दिवसात होऊ शकत नाही. यासाठी थोडा वेळ लागेल आणि तुर्की पाकिस्तानला प्रत्येक टप्प्यावर मदत करेन, असेही एर्दोगान यांनी म्हटले. याआधी इमरान खान यांनी खुद्द एर्दोगान यांची गाडी चालवली आणि त्यांना राष्ट्रपती भवनापर्यंत घेऊन गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here