आपण आधीच एकत्र यायला हवं होतं; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली उपमुख्यमंत्र्यांकडे खंत

0

अजितदादा, आपण इतकी वर्ष उगाच वेगळे राहिलो, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर व्यक्त केली. आम्ही चांगल्या आणि विधायक कामांसाठी एकत्र आलो आहोत. त्यामुळे आता चांगलं काम करुन दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही अशी शपथ छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊंच्या साक्षीने घेतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. अजितदादा, आपण आधीच एकत्र यायला हवं होतं, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी शिवभक्तांशी संवाद साधताना बोलून दाखवली. ‘मी आणि अजितदादा कार्यक्रम पाहात होतो. त्यावेळी एक कार्यकर्ता मला वळून वळून सांगत होता, दादांना सांभाळा. त्यावर मी आता उत्तर देतो. अहो अजितदादा, आपण एवढी मधली वर्षे उगाच घालवली. उगाचच इतकी वर्षे वेगळं राहिलो. आपण आधीच एकत्र यायला हवं होतं, असं मुख्यमंत्री म्हणाले. आता जे काही आम्ही एकत्र आलेलो आहोत, आता आम्ही जे काही चांगलं करायचं आहे ते करून दाखविल्याशिवाय राहणार नाही. एवढं एक वचन, एवढी एक शपथ जिजाऊ आणि शिवरायांच्या साक्षीने घेतो. गोरगरिबांच्या आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये ही भावना असली पाहिजे की हे महाविकास आघाडीचे सरकार आहे पण हे माझं सरकार आहे, आपलं सरकार आहे ही भावना गोरगरिबांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here