कराओके गीत गायन स्पर्धेचा ठरला इशान पाळेकर विजेता

0

रत्नागिरी : रत्नागिरी खबरदारच्या वुमेन्स कमिटीने आयोजित केलेल्या कराओके गीत गायन स्पर्धेत इशान पाळेकर याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याला रोख रुपये पाच हजार व मानचिन्ह असे बक्षीस देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक अनुप मयेकर याने तर तृतीय क्रमांक सतीश शेवडे याने पटकावला. त्यांना अनुक्रमे तीन हाजार व दोन हजार रुपयांचे बक्षीस व मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. स्पर्धा अतिशय अटीतटीची झाल्याने उत्तेजनार्थ बक्षीस वाढवून ते चिन्मय जोशी याला देण्यात आले.

सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी सौरभ मलुष्टे, पत्रकार आनंद तापेकर, प्रणील पाटील, प्रशांत पवार, राजेश शेळके, अमोल कलये आदी उपस्थित होते. या स्पर्धेला स्पर्धकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. ९५ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. १६ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेची निवड फेरी घेण्यात आली. रत्नागिरीतील सुप्रसिद्ध वादक कलाकार सचिन लांजेकर यांनी यामधून २० स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड केली. स्पर्धेची अंतिम फेरी दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता संसारे उद्यान मारुती मंदिर येथे घेण्यात आली. रत्नागिरीतील सुप्रसिद्ध गायक कलाकार नरेद्र रानडे व गायिका सौ. स्नेहल वैशंपायन यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले व २० स्पर्धकांमधून विजेत्यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला मोठ्या संखेने प्रेक्षकवर्ग लाभला होता व गायकांच्या सुमधुर आवाजाने त्यांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले. या कार्यक्रमाच्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमात ब्रायडल शोच्या स्पर्धकांना देखील गौरवण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला जिल्हा पोलीस वाहतूक निरीक्षक अनिल विभूते, एलसीबी चे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, उद्योजक सौरभ मलुष्टे, बंटी पाथरे, ब्रिजेश साळवी, प्राध्यापक आनंद आंबेकर आदी उपस्थित होते.

द्वितीय क्रमांक विजेते अनुप मयेकर
तृतीय क्रमांक विजेते सतीश राठोड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here