मोबाईल विक्रेत्यावर गोळीबार प्रकरण; आरोपीच्या संपर्कातील संबधितांची चौकशी होणार

0

रत्नागिरीतील मोबाईल विक्रेते मनोहर ढेकणे यांच्यावर हल्ला करणारा नामचीन आरोपी सचिन जुमनाळकर याला अवघ्या काही तासातच रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेऊन आपला लौकिक कायम ठेवला आहे. आरोपी सचिन जुमनाळकर हा जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटून बाहेर आला होता मात्र तो रजा संपलावर देखील कारागृहात हजर झाला नसल्याने त्याला फरार घोषित करण्यात आला होता. याच दरम्यान तो रत्नागिरीतील काहींच्या संपर्कात होता. याची संपूर्ण माहिती पोलिसांकडे असून त्या संबंधितांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here