इराणच्या उपराष्ट्रपतींनाही करोना व्हायरसची लागण

0

चीनपाठोपाठ इराणमध्येही करोना व्हायरस वेगाने पसरायला लागला आहे. आतापर्यंत इराणमध्ये 254 जण या व्हायरसमुळे आजारी पडले आहे. आजारी पडलेल्यांमध्ये इराणच्या उपराष्ट्रपती मासूमेह एब्तेकार यांचाही समावेश आहे. इराणमध्ये या आजारामुळे 19 जणांचा मृत्यू झाला आहे. एब्तेकार यांच्या आधी करोना व्हायरसची लागण इराणचे आरोग्य मंत्री इराज हिराची यांनाही झाली आहे. चीनमध्ये करोना व्हायरसमुळे दगावलेल्यांची संख्या 2 हजार 744 इतकी झाली आहे. 78 हजारांपेक्षा जास्त लोकं या व्हायरसमुळे आजारी पडली आहेत. एप्रिल महिना उजाडेपर्यंत हा आजार आटोक्यात आणू शकत नाही असं चीनमधील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. चीननंतर सर्वाधिक बळी हे सध्याच्या घडीला इराणमध्ये गेले आहेत. चीनव्यतिरिक्त दक्षिण कोरिया, इराण, जपान, हाँककाँग, सिंगापूर, तैवान, थायलँड, इंग्लंड, अमेरिका असा अनेक देशांमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण सापडले आहेत. हिंदुस्थानात सध्या तरी या व्हायरसने बाधित रुग्ण सापडलेला नाहीये. असं असलं तरी आरोग्य विभागाने या आजारीचा लागण होऊच नये यासाठी संपूर्ण खबरदारी घेतली आहे. गुरुवारी हिंदुस्थानने एक विशेष विमान पाठवून चीनधल्या वुहान इथे अडकलेल्या आपल्या नागरिकांना तसेच इतर देशाच्या नागरिकांना बाहेर काढले आहे. या विमानातून 195 हिंदुस्थानी आणि 41 परदेशी नागरिकांना हिंदुस्थानात सुखरूप परत आणण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here