रत्नागिरीत खंडणीची परंपरा नव्हती : राजन मलुष्टे

0

मोबाईल विक्रेते मनोहर ढेकणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यसाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत अनेक व्यापाऱ्यांनी आपली मत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासमोर मांडली. रत्नागिरीचे ज्येष्ठ व्यापारी राजन मलुष्टे यांनी सांगितले की, ढेकणे यांच्यावर झालेला प्रकार हा गंभीर गुन्हा असून त्यामध्ये पोलिसांनी आम्हाला न्याय दिला आहे. व्यापार्‍यांच्या मनातील भितीदेखील दूर केली आहे. मात्र रत्नागिरीला खंडणीची परंपरा नव्हती असे सांगत त्यांनी आपली खंत व्यक्त केली. बुधवारी झालेल्या या सभेला पोलीस उप विभागीय अधिकारी गणेश इंगळे, शहर पो.नि. अनिल लाड, पो.नि. सासणे यांच्यासह व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उदय पेठे, राजन मलुष्टे, महेंद्रशेठ जैन, कौस्तुभ सावंत, राजकुमार जैन व मोठ्या संखेने व्यापारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here