रत्नागिरीत कोरोनाचा संशयित रुग्ण आढळला

0

कोरोना व्हायरस ची लक्षणे असणारा 58 वर्षीय संशयित रुग्ण आज रत्नागिरीत आढळून आला असून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात वेगळ्या विभागात ठेवण्यात आले आहे. ही व्यक्ती रत्नागिरी थिबा प्यालेस येथे राहणारी असून काही कामानिमित्त दिल्लीला गेली होती. मात्र परत आल्यावर त्यांना ताप, सर्दी, खोकला हे आजार झाले. अजूनही त्याची संपूर्ण तपासणी झाली नसल्याने त्यांना करोना व्हायरसचिच लागण झाली आहे हे अजून स्पष्ट झाले नाही. मात्र ही सर्व लक्षणे करोना ची असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना म्हणून वेगळ्या विभागात ठेवण्यात आले आहे. सुरुवातीला ते एका खासगी इस्पितळात भरती झाले होते मात्र डॉक्टरांना आजाराबत शंका आल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
www.ratnagirikhabardar.com
7:32 PM 06-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here