बामणोली येथे १८ मार्चला जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा

0

चिपळूण तालुक्यातील श्री चंडकाई वाघजाई ग्रामदेवता मंदिर ट्रस्ट बामणोली यांच्यावतीने बुधवार १८ मार्च रोजी रात्री ८ वाजता ग्रामदेवतेच्या मंदिरासमोरील पटांगणात भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिमगा उत्सवाचे औचित्य साधून ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नृत्यकलेला वाव देण्यासाठी व रसिकांच्या सेवेसाठी जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ५०० रूपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. प्रत्येक नृत्य संचाला पालखी नृत्य सादर करण्यासाठी ३० मिनिटांचा वेळ देण्यात येईल. स्पर्धेत अनुक्रमे ३ क्रमांकाना ७ हजार रूपये, ५ हजार रूपये, ३ हजार रूपये व सन्मानचिन्ह तर उत्कृष्ट निशाण फडकवत नृत्य सादर करणाऱ्या नर्तकास ५०० रुपये व सन्मानचिन्ह तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक संचांनासुद्धा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here