स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडले गेले. मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही जागा आहे. त्यामुळे संगमेश्वर येथे संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे, अशी मागणी खासदार छ. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, शिवभक्तांच्या भावना लक्षात घेण्याची विनंती केली आहे. संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची दुरावस्था दूर करुन तेथे राज्यातील सर्वोत्तम स्मारक तयार करण्याची विनंती संभाजीराजेंनी केली आहे.