उशिरा का होईना अखेर निर्भयाला मिळाला न्याय!

0

नवी दिल्ली : बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना आज शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता दिल्लीतील तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. फाशीची शिक्षा रोखण्यासाठी निर्भयाच्या चारही दोषींनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केला. दिल्ली उच्च न्यायालयाने रात्री 12 वाजेच्या दरम्यान ही याचिका फेटाळून लावत फाशीची शिक्षा कायम ठेवली. अखेर साडेपाच वाजताच्या सुमारास या प्रकरणातील चारही दोषी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह यांना नराधमांना फाशी देण्यात आली. पहिल्यांदाच 4 जणांना एकाचवेळी फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. देशात 2004 नंतर तब्ब्ल 16 वर्षांनी फाशीची शिक्षा देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here