जमावबंदी असताना चिपळूणात लग्न समारंभ; चौघांवर गुन्हा दाखल

0

चिपळूण : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी असताना लग्न समारंभात 100 हून अधिक लोकांना एकत्रित बोलावल्यामुळे चिपळूणमधील नायशी मोहल्ला येथील चौघांवर पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 1951 चे कलम 37(1)(3) 135, साथ रोग अधिनियम 1897 कलम (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक मोठे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत, असे असतानाही नायशी येथील मोहल्ला येथे आज एका लग्न समारंभात 100 हून अधिक लोक एकत्र आले होते. त्याच पार्श्वभूमीवर चिपळूणमधील सावर्डे पोलिसांनी लग्नाला आमंत्रण देणाऱ्यांना टार्गेट करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here