पटवर्धन हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी सॅनिटायझर

0

रत्नागिरी : दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी सॅनिटायझर देण्यात आले. विद्यार्थी, पर्यवेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र संचालक संदीप कांबळे यांनी भारत शिक्षण मंडळाला पटवर्धन हायस्कूलमध्ये सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याची विनंती केली. संस्थेचे सचिव सुनील वणजू यांनी तत्काळ विद्यार्थी व पर्यवेक्षकांसाठी सॅनिटायझर उपलब्ध करून दिले. विद्यार्थ्यांची तपासणी करून रांगेत सोडत असताना त्याचवेळी सॅनिटायझरचे थेंब हातावर देऊन ते व्यवस्थित हाताच्या पंजाला लावण्याच्या सूचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here