परिस्थितीचे गांभीर्य ओळखा; नागरिकांना नम्र विनंती : रत्नागिरी खबरदार संपादक

0

रत्नागिरी: कोरोनाचे महाभयंकर संकट घोंगावत असताना काही नागरिकांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. करोनाचा फैलाव टाळण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे, रेल्वे बंद करण्यात आली आहे, एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र अजूनही काही नागरिक या गोष्टी गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. अनेकजण अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडल्याचे दिसून येत आहे. नागरीकानो प्रशासन जे सांगतेय ते आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच आहे. जर्मनीत २ आठवड्या पूर्वी २६० रुग्ण होते आज २२०० रुग्ण झालेत, येथील लोक देखील सुरुवातील बेफिकीर राहिले. हि चूक आपल्या रत्नागीरीकरांकडून होऊ देऊ नका. घराबाहेर पडण टाळा. मला माहित आहे कि अनेकांच्या रोजीरोटीचा देखील प्रश्न आहे. दिवसाकाठी मिळणाऱ्या पैशावर अनेकांचा चरितार्थ अवलंबून आहे. पण तरीही घरातच बसण आपल्या सर्वांच्या जीवासाठी महत्वाचे आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, विचार करा, परिस्थितीचे गांभीर्य ओळखा. आपण जर थातूरमातूर कारणे देऊन घराबाहेर पडू लागलो तर शासनाला नाईलाजास्तव संचारबंदी लागू करायला लागेल. हि वेळ आणू देऊ नका. पुन्हा एकदा सर्वाना नम्र विनंती घराबाहेर पडू नका.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

हेमंत वणजु
संपादक रत्नागिरी खबरदार
www.ratnagirikhabardar.com
02:39 PM 23/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here