महाराष्ट्रात संचारबंदी लागू

0

महाराष्ट्रातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात जमावबंदीनंतर आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सरकारी निर्देशांबाबत नागरिकांच्या अनास्थेमुळे अखेर राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव (COVID-19) रोखण्यासाठी महाराष्ट्रात अखेर संचारबंदी (Curfew) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत ही घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, ही काही मौजमजेची वेळ नाही. तरीही नागरिक रस्त्यावर काय सुरु आहे, हे बघण्यासाठी बाहेर पडतात. आज सकाळपासून रस्त्यांवर अनेक वाहने विनाकारण बाहेर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे आम्हाला आता नाईलाजाने राज्यभरात संचारबंदी लागू करावी लागत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here