सर्वोच्च न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणी बंद

0

तातडीच्या विषयांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

नवी दिल्ली: जगभरात कोरोना हाहाकार माजवला आहे. भारतातील संख्या चारशेच्या जवळपास पोहोचली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व खाजगी आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे, न्यायालयातील कामकाजांनाही ब्रेक लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच अशी एक गोष्ट होत आहे, ती यापूर्वी कधीही घडली नव्हती. सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांची सुनावणी प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली जाणार आहे. वकील आपल्या घरातून आपला युक्तीवाद करू शकतील अशी यंत्रणा सुरू करण्यावर न्यायालय काम करत आहे, असे सरन्यायाधिश एस. ए. बोबडे यांनी सांगितले. याबाबरची लिंक लवकरच वकीलांना देण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here