संचारबंदी काळात खासगी डॉक्टरांनी क्लिनिक बंद ठेऊ नये; आरोग्य विभागाच्या सूचना

0

केंद्र सरकारने संचारबंदी लागू केली असली तरी सरकारी तसेच खाजगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण (ओपीडी) आणि आंतररुग्ण विभाग नेहमीप्रमाणे खुले ठेवावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. संचारबंदी लागू झाल्यानंतर अनेक डॉक्टरानी आपली क्लिनिक बंद ठेवली आहेत. तर काही मोठ्या हॉस्पिटल मध्ये गर्दी टाळण्यासाठी ओपीडीची संख्या कमी केली जात आहे. मात्र अनेक रुग्णांना वरचेवर रुग्णालयात जाऊन तपासणी करावी लागते. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने खासगी व शासकीय रुग्णालयांना ओपीडी बंद न ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच रुग्णालय स्तरावर फ्ल्यू सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी वेगळी ओपीडी करण्यास सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here