आम्हां शिवसैनिकांकडून कोरोनाविरुद्धच्या लढाईत ‘हा’ खारीचा वाटा – शिवसेना

0

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांसाठी पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केली आहे. तरीही देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. कोरोनाविरोधात या लढ्यात शिवसैनिक खारीचा वाट उचलणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबद्दल घोषणा केली आहे. ‘सेनेचे सर्व खासदार व आमदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देत आहेत’ अशी माहिती राऊत यांनी दिली. तसंच, ‘कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत हा खारीचा वाटा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे युद्ध आपण नक्की जिंकू’ असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here