आधी कोरोना तपासणीचं किट पूर्ण केलं नंतर दिला बाळाला जन्म

0

पुणे : माय लॅबच्या टीममध्ये काम करणाऱ्या पुण्याच्या ‘मिनल भोसले’ यांचं सध्या सर्व स्तरातून कौतुक होतं आहे. 9 महिन्यांची गर्भवती असताना देखील त्यांनी कोरोना तपासणीचं किट पूर्ण करण्याचे काम केलं. नुकताच त्यांनी एका गोड बाळाला जन्म दिला आहे . कोरोनाच्या तपासणीसाठी आता मेड इन इंडिया किट्स तयार झाली आहेत. पुण्याच्या ‘माय लॅबनं’ आधीच संशोधन सुरू केलं आणि अवघ्या सहा आठवड्यांतं मेड इन इंडिया किट तयार केलं. हे किट आता बाजारात उपलब्ध आहे. देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. हीच वाढणारी रूग्णांची संख्या लक्षात घेता सॅम्पल्स टेस्ट कीट कमी पडत आहेत. त्यावर पुण्यातल्या ‘माय लॅब’ डिस्कवरी सोल्युशन्स कंपनीनं संशोधन करुन मेड इन इंडिया टेस्ट किट विकसित केलं आहे. मिनल भोसले याच टीममध्ये काम करत आहेत. या कंपनीत त्या संशोधन आणि विकास विभागाच्या प्रमुख आहेत. हे किट तयार होण्यासाठी चार महिन्यांचा वेळ लागणार होता. मिनल यांच्या डिलीव्हरीची तारीख देखील जवळ येत होती. त्यांनी जोमाने काम करत अवघ्या सहा आठवड्यात हे किट तयार केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here