प्रभागातील छोट्या रस्त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी छोटी गाडी सज्ज

0

रत्नागिरी : नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्या आदेशाने शहरातील मुख्य रस्त्यांवरून क्लोरिनचा हाय डोस असलेल्या पाण्याची फवारणी करण्यात आली. मात्र प्रभागातील छोट्या रस्त्यांवरून अग्निशमन बंब नेता येत नसल्याने या रस्त्यांवरील फवारणी राहिली होती. मात्र नागरिकांच्या मागणीनुसार नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी फवारणीसाठी छोटी गाडी देखील केवळ एका दिवसात सज्ज केली आहे. आता याद्वारे शहरातील छोट्या रस्त्यांवरून हि फवारणी केली जाणार आहे. शहरात निर्जंतुकीकरण झाल्यास साथीचे आजार पसरण्यास आळा बसणार आहे. नगराध्यक्षांच्या या कामाचे जनतेतून कौतुक होत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
01:58 PM 28/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here