कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य

0

न्यूयॉर्क : अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1 लाख 42 हजार 402 झाली आहे. तर, 2 हजार 497 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या अमेरिकेत कमी असली तरी, रुग्णांचा आकडा मात्र वाढता आहे. अशा परिस्थितीतही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र ट्रम्प यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. जर आमच्या प्रशासनाने मृतांची संख्या 10 लाखांपर्यंत आटोक्यात आणली तर ते खूप चांगलं काम असेल, असं वक्तव्य केलं आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्याने सर्व चकित झाले आहे. एवढंच नाही तर याआधी त्यांनी लवकरच अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्याची अपेक्षाही व्यक्त केली होती. दोन आठवड्यांत मृत्यू दर शिगेला पोहचण्याची शक्यता आहे. जूनपर्यंत अमेरिका पुन्हा पुर्वपदावर येण्यास सज्ज होईल, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सामाजिक अंतर आणि इतर उपाययोजना न केल्यास 2. 2 दशलक्ष किंवा त्याहून अधिक लोकांचा मृ्त्यू होईल. म्हणूनच जर आपण हे सांगत राहिलो की 10 लाख ही एक भयानक संख्या आहे पण 20 लाख लोकांचा मृत्यू होण्यापेक्षा ती कमीच आहे, असंही ट्रम्प यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here