मुंबई : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. मात्र आता एक धक्कादायक चित्र समोर आलं आहे. आईसह तीन दिवसांच्या तान्ह्या बाळाला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. २९ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता आपल्या पत्नीची प्रसुती झाली. त्यानंतर माझ्या पत्नीला आणि बाळाला दुपारी १२.३० च्या सुमारास एका वैयक्तीक खोलीत हलवण्यात आलं. पतीने या खासगी हॉस्पिटलवर आरोप केला आहे की, त्याच्या पत्नीला कोरोना रुग्णाच्या बाजूचा बेड दिला होता. त्यामुळे माझ्या पत्नीला आणि मुलाला कोरोनाची लागण झाली, अशी माहिती महिलेच्या पतीनं दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:49 AM 02-Apr-20