राजिवड्यात आरोग्य तपासणीसाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पिटाळून लावणाऱ्या माजी नगरसेवकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

0

रत्नागिरी : राजिवडा येथे कोरोना बाधित रुग्ण सापडताच राजिवडा परिसर सील करण्यात आला आहे. आज सकाळपासून आरोग्य खात्याने येथील सर्व नागरिकांची तपासणी करण्यासाठी आशा वर्कर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम पाठवली आहे. या आरोग्य कर्मचाऱ्यांना येथे तपासणी करण्यासाठी एका माजी नगरसेवकाने अटकाव केला. येथे तपासणीसाठी आलात तर येथील माहोल बिघडविण अशी धमकी देखील दिली. यानंतर हि सर्व पथके पुन्हा परत आली. यावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी कणखर भूमिका घेत राजिवडा गाठले व येथील जनतेला पुन्हा एकदा आवाहान केले. आरोग्य पथकांना अटकाव करणाऱ्या माजी नगरसेवकाची पोलिसी भाषेत चांगली कानउघाडणी करीत या माजी नगरसेवकाला व एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. या या घटनेचे चोरून व्हिडीओ शुटींग करणाऱ्याला चांगलाच प्रसाद देण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड या सर्वांनी पुन्हा एकदा नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहान केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:19 PM 04/Apr/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here