लांजा येथे संस्थात्मक विलगीकरण केलेले नागरिक अस्वच्छतेच्या विळख्यात

0

लांजा : लांजा तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थात्मक विलगीकरण कक्ष न्यू इंग्लिश स्कुल लांजा व कन्याशाळा लांजा येथे करण्यात आला आहे. १ एप्रिल नंतर मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली व इतर जिल्ह्यातून व राज्यातून लांजा तालुक्यात आलेल्या नागरिकांची तपासणी करून संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी मुबलक पाणी व्यवस्था नसल्याची तक्रार येथे कॉरेंटटाईन करून ठेवलेल्या नागरिकांनी केली आहे. मुबलक पाणी व्यवस्था नसल्याने स्वच्छतागृह व इतरत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. या लोकांच्या जेवणासाठी अनेक संस्थांनी पुढाकार देखील घेतला आहे मात्र प्रशासनाने येथील स्वच्छतेकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
04:47 PM 04/Apr/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here