चालकाचा ताबा सुटून बोलेरो पीकअपला अपघात; सातजण जखमी

0

चिपळूण : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व जिल्हा बंदी असताना भाजी वाहतुकीच्या नावाखाली प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे चिपळुणात उघड झाले आहे. एका बोलेरो पीकअप गाडीतून २४ मजुरांना विजापूरला घेऊन जात असताना सती पुलाजवळ अपघात झाला. यामध्ये सातजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल करून गाडी जप्त केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. ७)मध्यरात्री १:३० वा. सती पुलाजवळ घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेर्डी येथील बोलेरो पीकअप गाडी घेऊन नीलेश मारूती चव्हाण (रा. शिरगाव) हे चोवीस कामगारांना घेऊन कराड मानि विजापूरच्या दिशेने जात होते. यामध्ये रोजंदारीवर काम करणारे कामगार होते. गाडी सती पुलाजवळ आली असता चालकाचा ताबा सुटला व गाडी पलटी झाली. या अपघातात सातजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here