वाधवान कुटुंबाला प्रवासासाठी पास देणं महागात

0

DHFL चे प्रमोटर्स आणि YES BANK घोटाळ्यात आरोप असलेले कपील आणि धीरज वाधवान बंधू यांच्यासह कुटुंबियांना लॉकडाऊनदरम्यान प्रवासाचे व्हीआयपी पास देणं चांगलच भोवलं आहे. खंडाळ्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत करणं, विशेष प्रधान सचिवांना भोवलं. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत गृह विभाग विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गृहमंत्रालय आणि सरकारकडून याची तातडीनं चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख्य यांनी दिलं आहे. दरम्यान, कपिल आणि धीरज वाधवान यांच्यासह 23 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाधवान कुटुंबाशी निगडीत 23 जणांना पाचगणीच्या बेल एअर रुग्णालयात 14 दिवसासाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here