पंतप्रधानांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः जनतेच्या भेटीला

0

मुंबई : पंतप्रधानांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः जनतेला योग्य माहिती देत त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यात झाकण्यासारखं काही नाही. आपण आपल्या परीने सर्व प्रयत्न करत आहोत. त्यामुळे घाबरायचे कारण नाही. पण ही बाब चिंतेची आहे, त्यामुळे खबरदारी घ्यावी. महापालिका घरोघरी जाऊन तपासणी करत आहे. आता समोरून रुग्ण ३३ हजारच्या आसपास चाचण्या झाल्या आहेत. यामध्ये १००० जण COVID 19 बाधित आहेत. मात्र ते आता बरे होत आहेत. त्यांच्यामध्ये सुरवातीची लक्षण होती, त्यामुळे ते आता बरे होत आहेत. मृतांची संख्या वाढत आहेत. उशिरा उपचारासाठी जे आले त्यांचा मृत्यू झाला. तसेच नागरिकांनी खबरदारी घेईला पाहिजे. मास्क लावलं पाहिजे, घरातच राहायचं आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला घरात राहणे आवश्यक आहे. कोरोना पसरतोय हे जगजाहीर आहे.14 तारखेनंतरही लॉकडाऊन कायम ठेवणार. 30 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. मुंबई पुण्यातील रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र शेतीच्या कामांमध्ये लॉकडाऊन आडवा येणार नाही. शेतीच्या वस्तू , अन्नधान्य , जीवनावश्यक वस्तू सुरळीतपणे मिळतील. त्यामुळे गडबडून गोंधळून जाऊ नका. पुढील सूचना या वेळोवेळी दिल्या जातील. विद्यापीठांच्या परीक्षा, उद्योग, कारखाने कधी सुरु होणार याबाबत विचार, चर्चा सुरु आहेत. त्यामुळे लवकरच आपण या सर्व परिस्थितीवर मत करू शकतो. आज देश एकटवलेला आहे. असाच देश एकत्र राहिला तर आपण महासत्ता बनू शकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here