अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार; मृतांचा आकडा 70,000 पार

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 2,55,176 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 36 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 36, 90,863 पेक्षा जास्त झाली आहे. एकट्या अमेरिकेत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 70 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. त्यामध्ये, गेल्या 24 तासांत 2,333 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. जॉन हॉप्किन्गस युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 24 तासात 2333 जणांचा जीव गेला आहे. तर जगभरात आत्तापर्यंत 2,55,176 जण मृत्युमुखी पडले आहेत. जगातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 36,90,863 पर्यंत पोहोचली आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार माजला असून याचा सर्वाधिक विपरीत परिणाम युरोप आणि अमेरिकेत जाणवत आहे. अमेरिकेते आत्तापर्यंत 70,761 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, 12,21,655 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. सुदैवाची बाब म्हणजे येथील 1,89,164 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जवळपास 75 लाखांपेक्षा अधिक रुग्णांची आतापर्यंत तपासणी झाली आहे. कोरोना प्रादुर्भावाचा सर्वाधिक परिणाम झालेल्या देशांमध्ये अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेसह इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेखालोखाल इटलीमध्ये 9315 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये मृतांचा आकडा 25 हजार 428 वर गेला आहे. फ्रान्समध्ये कोरोना व्हायरसमुळे 25 हजार 201 जणांचा तर ब्रिटनमध्ये 28 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here