गोव्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आणखी दोघांची भर

पणजी : एप्रिल महिन्यामध्ये गोव्यामध्ये एकही कोरोनाग्रस्त नव्हता. यामुळे ते देशातील कोरोनामुक्त राज्य बनले होते. मात्र मे महिन्यात गोव्यामध्ये कोरोनाग्रस्त सापडायला सुरुवात झाली असून 16 मे शनिवारी कोरोनाग्रस्तांची संख्या 10 पर्यंत पोहोचली होती. गोव्यात कोरोना बाधितांच्या संख्येने प्रथमच दोन अंकी आकडा गाठला आहे. नवीन दोन्ही रुग्ण वास्को येथील आहेत. कोलकाता येथे बार्ज सोडण्यासाठी गेलेल्या वास्कोमधील सातपैकी तीन जणांना कोरोनाची बाधा झाली होती. या रुग्णांची दुसरी कोरोना चाचणी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये करण्यात आली. त्यात दोघे पॉझिटीव्ह आढळून आले तर एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे गोव्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 10 इतकी झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
1:09 PM 16-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here