चिपळूण, खेडमधून ७१० मजूर बिहार, कर्नाटकात रवाना

रत्नागिरी : कोरोना प्रतिबंधक लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकून पडलेल्या आणि आपापल्या गावी जाऊ इच्छिणाऱ्या चिपळूण आणि खेड तालुक्यातील ७१० मजुरांना विशेष रेल्वेने बिहार आणि कर्नाटकात रवाना करण्यात आले. चिपळूण तालुक्यात अडकलेल्या झारखंडमधील मजुरांना अलीकडेच स्वगृही पाठवण्यात आले होते. त्यानंतर चिपळूणच्या प्रशासनाने बिहार आणि कर्नाटकातील प्रवाशांना रेल्वेने त्यांच्या राज्यात रवाना केले. प्रशासनाने या मजुरांच्या जेवण-अल्पोपाहाराची उत्तम व्यवस्था केली होती. बिहारमधील ४५० मजुरांना १९ एसटी बसेसमधून रत्नागिरी रेल्वेस्थानकावर सोडण्यात आले. त्यासाठी प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, नायब तहसीलदार तानाजी शेजाळ आणि त्यांचे सर्व सहकारी, पोलीस कर्मचारी, पोलीस मित्र, आरोग्य, चिपळूण एसटी आगारातील कर्मचारी रात्रभर मध्यवर्ती बसस्थानकात तळ ठोकून होते. रत्नागिरीतून मजुरांना आपल्या राज्यात रवाना करण्यात आले. खेडमधून २६० जणांनाही याच पद्धतीने रवाना करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here