बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

रामपूर : रामपूर-बौद्धवाडीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू ठार झाले आहे. बौद्धवाडीतील शेतकरी वासुदेव कृष्णा जाधव यांच्या शेतघरातील जर्सी वासरावर दि. १८ रोजी मध्यरात्री बिबट्याने हल्ला केला. त्यात लचके तुटलेल्या अवस्थेत वासरू सापडले. या घटनेची वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी दखल घेऊन पंचनामा केला. रामपूर सरपंच स्मिता जाधव व अन्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. या हल्ल्यात वासुदेव जाधव यांचे सुमारे सात हजारांचे नुकसान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here